You are currently viewing शिवसेनेच्या खासदार आलेल्या भावना गवळींनीही धुडकावले ईडीचे समन्स..

शिवसेनेच्या खासदार आलेल्या भावना गवळींनीही धुडकावले ईडीचे समन्स..

मुंबई /-

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावून आज आपल्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते, पण त्यांनी हे समन्स धुडकावून लावले आहे. आपल्याला चिकनगुनिया झाला असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे त्यांनी ईडीला कळवले आहे.

त्यांच्या वकिलांनी सांगितले की, भावना गवळींचे मेडिकल सर्टिफिकेट ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. त्यांनी या आधीचे 4 ऑक्‍टोबरचे समन्सही कामाच्या व्यस्ततेचे कारण देऊन त्यासाठी उपस्थित राहण्याचे नाकरले होते.

एका खासगी ट्रस्टचे खासगी कंपनीत रूपांतर करून 18 कोटी रुपये रकमेचा त्यांनी फ्रॉड केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात त्यांचे सहकारी सईद खान यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.

गवळी यांच्या वकिलांनी सांगितले की या व्यवहारात झालेल्या गैरप्रकारांच्या विरोधात स्वतः भावना गवळी यांनीच तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे आणि या प्रकरणात चार्जशीटही दाखल झाले आहे.

अभिप्राय द्या..