You are currently viewing कुपवडे येथे गोठ्यातील दोन बैल गेले चोरीला..

कुपवडे येथे गोठ्यातील दोन बैल गेले चोरीला..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील शेतकरी वसंत जगन्नाथ गोसावी यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरीला गेल्याची घटना घडली आहे या दोन बैलांची किंमत सुमारे लाखो रुपये आहे बैल चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे. याबाबत वसंत गोसावी यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

सध्या बैल तसेच गुरे चोरणारी टोळी कार्यरत झाली आहे ही टोळी आधी माहिती घेते आणि त्यानंतर जनावरांची चोरी करतात अशाच प्रकारची चोरी कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील वसंत गोसावी यांच्या येथे घडली आहे वसंत गोसावी यांच्या घरापासून १ किमी अंतरावर गुरांचा गोठा आहे.आणि त्या गोठ्यामध्ये तीन बैल बांधले असतात त्यापैकी दोन बैल तीन ते चार महिन्यापूर्वी खरेदी केले होते.ते दोन बैल चोरीला गेले आहेत. यामध्ये त्या बैलांना गोठ्यातून व्यवस्थित बाहेर काढून टेम्पो मध्ये बसवून त्याला त्यांना चोरून घेऊन गेले आहेत याबाबत टेम्पोच्या टायरची ठसे निदर्शनास आले आहेत.

वसंत गोसावी यांनी हे बैल गोठ्यात बांधून ते घरी गेले होते आणि सकाळी या बैलांना चारावयासाठी सोडायला गेले असता गोठ्यामध्ये बैल सापडून आले नाहीत. याबाबत पोलिस ठाण्यात वसंत गोसावी यांनी तक्रार नोंदवली आहे.

अभिप्राय द्या..