You are currently viewing तारकर्ली पर्यटन संस्थेचच्या अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड..

तारकर्ली पर्यटन संस्थेचच्या अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड..

मालवण /-

तारकर्ली पर्यटन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार पदी अनुक्रमे मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर आणि दर्शन वेंगुर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

विद्यमान अध्यक्ष बाबा मोंडकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पर्यटन व्यावसायिकांनी सहदेव साळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सहदेव साळगावकर व नवीन कार्यकारणीचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, तारकर्ली पर्यटन संस्थेच्या माध्यमातून किनारपट्टीवरील जलक्रीडा व होम स्टे यांना प्रशासन स्तरावर आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नाव देश विदेशात पोहोचविण्यामागे संस्थेचे खूप मोठे योगदान आहे. येणाऱ्या काळात नवीन संचालक मंडळाने ही जबादारी स्वीकारून पर्यटन व्यावसायिक व प्रशासन यांचा समन्वय साधून संस्थेचे कामकाज चालवावे, असे ते म्हणाले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सर्व पर्यटन व्यावसायिकांना सोबत घेऊन व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रश्नावर संस्था काम करेल, असे सांगितले. यावेळी देवानंद लोकेगावकर, मालवण पर्यटन महासंघ तालुकाध्यक्ष अवि सामंत, रवींद्र खानविलकर, रामा चोपडेकर, चंद्रशेखर परब, सीमाव फर्नांडिस, श्रीमती दीप्ती तारी व अन्य पर्यटन व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..