You are currently viewing युवा भजनी गायक संतोष मसुरकर यांचा मसरेत सत्कार.

युवा भजनी गायक संतोष मसुरकर यांचा मसरेत सत्कार.

मसुरे /-

मसुरे टोकळवाडी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध भजनी बुवा, प्रसिध्द नाट्य कलाकार संतोष मसुरकर यानि अल्पावधीतच भजन, नाट्य,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे साई मंदिर येथे सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटकर आणि मेघश्याम पेडणेकर यांच्या शुभहस्ते साईनाथ भक्त मंडळ मसुरे यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. आपल्या अल्पावधीत संगीत भजन, कला क्रीडा, नाट्य क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल या वेळी सर्वांनी विशेष कौतुक केले. मालवण तालुक्यामध्ये भजन क्षेत्रामध्ये ठीक ठिकाणी आपल्या गोड गायकीने संतोष याने भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. यावेळी मेघश्याम पेडणेकर, प्रदीप पाटकर, बाळू दळवी, दिपक पेडणेकर, शैलेश मसुरकर, दीपक शिंदे, दिनकर दुखंडे, यशवंत परब, समीर सावंत, सुनील प्रभुगावकर, सुनील दूखंडे, रोशन दुखंडे, झुंजार पेडणेकर, बाबू मुळीक, नीळकंठ शिरसाट, महेश दुखंडे, बबन परब, बबन मसुरकर, वानिष शिरसाट, मनीष घाडीगावकर, भालचंद्र खोत, अनील दुखंडे आणि सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..