मसुरे /-
महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा बदली शिक्षकानी उत्स्फुर्त सहभाग घेतला.तसेच संख्येच्या लिमिटेशनमुळे ब-याच शिक्षकांना सहभागी होताही आले नाही.
आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश होण्यासाठी प्रशासना कडून वेळोवेळी दिशाभूल करणारी माहिती दिली जाते याबाबत शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यातील अडचणींवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.व त्या दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
याबाबत शिक्षक भारती च्या वतीने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल असे संघटनेच्या वतीने निश्चित करण्यात आले.
लवकरच मा.आमदार कपिल पाटील साहेब यांच्या समवेत या बाबत सभा होणार आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश होण्यासाठी लढा उभारला जाणार आहे.
सर्वांनी संघटनात्मक हेवेदावे विसरून मा कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा.असे आवाहन दयानंद नाईक – राज्य उपाध्यक्ष ,किसन दुखंडे -राज्य संघटक ,संतोष पाताडे – जिल्हाध्यक्ष ,आशा गुणीजन – जिल्हाध्यक्ष महिला आघाडी यांनी केले आहे.
सभा यशस्वी करण्यासाठी अरुण पवार -जिल्हासरचिटणीस, रामचंद्र डोईफोडे जिल्हा मुख्य संघटक ,दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष कणकवली, वसंत गर्कल तालुकाध्यक्ष वेंगुर्ले ,संतोष कोचरेकर तालुकाध्यक्ष मालवण, विनायक कांबळे -तालुकाध्यक्ष देवगड ,मणिपाल राऊळ -तालुका तालुकाध्यक्ष दोडामार्ग ,कृष्णा कालकुंद्रीकर , रुपाली जाधव ,अलका माने , श्री खोत, श्रीराम विभुते, सखाराम झोरे साबळे सर, माने सर व संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या सर्वच पदाधिकारी , सदस्यांनी व आंतरजिल्हा बदली धारक शिक्षक समन्वयकानी प्रयत्न केले .