You are currently viewing २८ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान एकाच ठिकाणी करता येणार दिवाळीची खरेदी.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

२८ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान एकाच ठिकाणी करता येणार दिवाळीची खरेदी.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

कणकवली /-

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत च्या वतीने दिवाळी बाजार संकल्पना राबविण्यात येत आहे. युथ वेलफेअर असोसिएशन च्या माध्यमातून मातीच्या भांड्यांपासून उपलब्ध असणाऱ्या विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात येणार आहे. कणकवली शहरातील महिला बचतगटांचे विविध उत्पादन, घरगुती आकाश कंदील, दिवाळीसाठी लागणारे साहित्य याची विक्री या दिवाळी बाजार मध्ये केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ होम मेड वस्तूंची विक्री या दिवाळी बाजारात केली जाणार आहे. एसटी स्टँड लगतच्या पेट्रोल पंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिजखाली 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान हा दिवाळी बाजार भरणार आहे. यासाठी बैठक व्यवस्था, लाईट व्यवस्था कणकवली नगरपंचायतच्या वतीने मोफत केली जाणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता या दिवाळी बाजाराचे उद्घाटन होणार आहे. कुंभार समाजाच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी यावेळी उपलब्ध असणार आहेत. कुंभारांच्या मातीकामांचा लाईव्ह डेमो यावेळी ग्राहकांना पाहता येणार आहे. मातीचा आकाशकंदील हे या दिवाळी बाजाराचे खास आकर्षण असणार आहे. दिवाळी सणानिमित्त ग्राहकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी या दिवाळी बाजारात उपलब्ध होणार आहेत. यावेळी बोलताना युथ वेलफेअर असोसिएशन चे विवेक ताम्हणकर यांनी कुंभार समाजाला थेट ग्राहक मिळावेत. प्लास्टिक अथवा चायनामेड वस्तू वापरून पर्यावरण प्रदूषण करण्यापेक्षा या दिवाळी बाजारातून पर्यावरणपूरक वस्तू खरेदी करावी, असे आवाहन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, बांधकाम सभापती मेघा गांगण, आरोग्य सभापती अभि मुसळे, नगरसेवक ऍड. विराज भोसले, नगरसेवक बाबू गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, युथ वेलफेअर असोसिएशन चे विवेक ताम्हणकर, सचिव रुपेश घाडी, निष सांगवेकर, रौफ काझी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..