You are currently viewing कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील शाळकरी मुलाचा विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू..

कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील शाळकरी मुलाचा विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील जानू सखाराम खरात (१७ ) या शालेय विद्यार्थ्याचा घरातील वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वा. घडली.

यातील मयत जानू सखाराम खरात व त्याची आई सुनंदा खरात या दोघांनी आज दुपारी १२.४५च्या दरम्यान कुडाळ बाजारपेठेत जाऊन मासे व इतर सामान घेऊन आले. यानंतर जानूची आई सुनंदा ही मासे धुण्यासाठी मागच्या दरवाजाला गेली. यावेळी अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. यावेळी तिने घरात जाऊन पाहिले असता तिचा मुलगा जानू हा ईलेक्टरीक मीटरच्या खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या स्थितीत आढळून आला. त्यावेळी त्याच्या डाव्या हाताची दोन बोटे जळलेली दिसली व छातीतून धूर येत असलेला दिसला. यानतर तिने मोठ मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला शेतकाम करणारे सखाराम खरात हे धाऊन आले मात्र तो त्यापूर्वीच मयत झाला होता. सुनंदा खरात हिचे सासर खानोली येथे आहे. कामानिमित्त या युवकाचे वडील सखाराम खरात, आई सौ. सुनंदा खरात व स्वत: जानु खरात हे तिघेजण नेरूर दुर्गावाडी आब्बास शेख यांच्या घरी गेली आठ ते दहा वर्ष भाड्याने राहत आहेत. जानू खरात हा कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता. या घटनेची फिर्याद भागो धोंडी वरक यांनी कुडाळ पोलिसात दिली. • असून या घटनेचा अधिक तपास पो हे काँ श्री शिंगाडे करत आहेत.

अभिप्राय द्या..