You are currently viewing राजन जाधव यांनी आ.नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती शिवसैनिकान माहिती आहे.;अतुल बंगे.

राजन जाधव यांनी आ.नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती शिवसैनिकान माहिती आहे.;अतुल बंगे.

कुडाळ/-

राजन जाधव आणि ते आदर्श मानणारे नेते आमदार वैभव नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांना पुर्ण माहिती आहे केवळ तुमच्या जाण्याने फरक पडणार नाही असे मी म्हणालो म्हणुन माझ्या वर आरोप करण्यास धन्यता मानुन केवळ कोणी सांगितले म्हणून माझ्यावर आरोप केला म्हणजे माझी पक्षातील प्रतिमा कमी होणार नाही असा पलटवार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केला.श्री बंगे म्हणाले गेली दोन वर्षे हे तीनही सदस्य शिवसेना पक्षाविरोधात आणि आमदार वैभव नाईक यांच्या एकेरी शब्दात कायमच उल्लेख करुन धन्यता मानत होते त्यापेक्षा गेल्या विधानसभा निवडणुकीत राजन जाधव कुठल्या उमेदवाराचे पैसे घेऊन प्रचार करत होते ते कुडाळ तालुक्यातील सगळ्या शिवसैनिकांना माहीत आहे असे बंगे यांनी सांगुन पंचायत समिती सभापती निवडणुकीत कोणाबरोबर सौदेबाजी करुन सभापती निवडीवेळी कोणाचे फोन येत होते ते आम नाईक यांना वाढदिवसाच्या माहीत होते जर का सौ नुतन आईर सभापती शिवसेनेच्या बसल्या नसत्या तर त्यावेळी या राजन जाधव व प्राजक्ता प्रभु यांनी निर्णय घेतल्या प्रमाणेच होणार होते आणि हे तुम्ही दोन्ही सदस्यांनी बोलुन दाखवले होते असाही आरोप श्री बंगे यांनी करून सुबोध माधव यांना माझ्यावर गटबाजीचा आरोप करायला लावणा-या लोकांनी त्यावेळी या तीनही सदस्यांना फुटण्यासाठी सहकार्य केले होते हेही सर्वश्रुत आहे तसेच वालावल गावात निधी नाही आणि हुमरमळा गावात कोट्यावधी रुपयांचा निधी असा आरोप करणा-या माझ्या पंचायत समिती सदस्य सौ प्रभु यांनी स्वतः ला मिळणारा सेस फंड दुस-या मतदार संघात विकुन पर्यटन सफर केली होती त्यावेळी स्वतः चा मतदार संघ दीसला नाही असा आरोप श्री बंगे यांनी करुन जी साधी ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही त्यांना शिवसेनेने पंचायत समिती सदस्य केले असाही पलटवार बंगे यांनी करून आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत हे ठरवतात कोणाला काय करायचे आणि कोणाला नको त्यामुळे माझी पक्षातुन हकालपट्टी करा म्हणुन तुम्हाला सांगणारे लोक आता शिवसेना सोडुन जाणा-या लोकांना देव मानतात आणि आदर्श म्हणवुन घेतात याचाही खजाना आम नाईक खा राऊत यांच्या कडे आहे.

अभिप्राय द्या..