You are currently viewing चोरांनी फोडली तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरांच्या पदरी आली निराशाच…

चोरांनी फोडली तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरांच्या पदरी आली निराशाच…

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरांनी काल रात्री फोडली खरी मात्र, त्यामध्ये चोरट्याच्या हाती किरकोळ रकमेशिवाय काहीच लागले नाही. सोमवारी सकाळी पुजारी सदानंद गुरव यांच्या ही बाब निदर्शनास आली.

नवरात्रौत्सवानंतर समितीने दान पेटीतील सर्व रक्कम हिशेब करून रविवारी सप्ताह समाप्ती वेळी सर्वांच्या उपस्थित सुरक्षित ठेवण्यात आली. त्यामुले दानपेटी फोडल्यानंतर चोरांच्या हाती केवळ निराशाच लागली. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसल्याने ही दानपेटी फोडून बाहेर टाकून दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे

याबाबतची माहिती फोंडाघाट पोलिस स्थानकात देण्यात आली. फोंडाघाट बीट अंमलदार वंजारे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर देणगी पेटीची शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी मंदिराच्या परिसरातच फोडलेली पेटी आढळून आली. या चोरीमध्ये किरकोळ रक्कम चोरट्याच्या हाती लागली. या घटनास्थळी फोंडाघाट आउटपोस्ट व कणकवली पोलिस यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे.

अभिप्राय द्या..