You are currently viewing सेनेचे जि. प. सदस्य ३ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेणार भेट ; जि. प. सदस्य प्रदीप नारकर.

सेनेचे जि. प. सदस्य ३ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेणार भेट ; जि. प. सदस्य प्रदीप नारकर.

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषद अधिनियम व शासन निर्णय न पाळणाऱ्या व दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज सादर केले.

जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन संगनमताने चुकीच्या पद्धतीने गेली अनेक वर्षे कारभार चालवीत आहेत. याबाबत कोकण आयुक्त यांना पत्रव्यवहार केलेला आहे. तरी विविध मुद्द्यांबाबत जाणीवपूर्वक चुका केल्या जात आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद स्व निधी वाटप करीत असताना विरोधी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुचविलेली कामे जाणीवपूर्वक घेतली जात नाहीत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत चालविलेल्या काही विषयांवर शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी हरकती घेतलेल्या असून ठाम विरोध केला आहे. याबाबत चा ठराव कोकण आयुक्त व शासन दरबारी पाठविण्याबाबत सुचविलेले असतानाही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.

१४ जुलै, २०२१ चा सर्वसाधारण सभेत वॉटर प्युरिफायर खरेदीची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याबाबत सूचना केलेली असतानाही अद्यापही अहवाल दिलेला नाही. अशा विविध वादग्रस्त मुद्द्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार व सभागृहामध्ये प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. याबाबत सर्व शिवसेना जिल्हा परिषद सदस्य ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत .अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी आज दिली.

अभिप्राय द्या..