You are currently viewing कळसुलकर हायस्कूल येथे नवदुर्गा सन्मान सोहळा व गणपती मखर स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..

कळसुलकर हायस्कूल येथे नवदुर्गा सन्मान सोहळा व गणपती मखर स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..

सावंतवाडी /-

महाराष्ट्र राज्यमध्ये विविध प्रकारच्या विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना आहेत, महिलांचा कुठेही सन्मान त्या संघटनेमार्फत केल्या जात नाही. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा नवदुर्गा म्हणून केलेला स्त्री सन्मान हा उल्लेखनीय सन्मान असून या संघटनेचा आदर्श इतरही संघटनांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वनिता प्रभूतेंडुलकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मान सोहळा व गणपती मखर स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाला. यावेळी वनीता प्रभूतेंडुलकर अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, उपाध्यक्ष धनश्री गावडे, उपाध्यक्ष सुहास देसाई, सहसचिव प्रदीप सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक काका मांजरेकर, अध्यापक संघाचे अजय शिंदे, राज्य प्रतिनिधी पांडुरंग दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव केंकरे, सचिव गजानन कानसे, रुपेश मोरजकर, माजी खजिनदार निलेश पारकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर, सचिव विजय गवस, मालवण तालुका अध्यक्ष शर्मिला गावकर, बीसीए कॉलेजचे प्राध्यापक श्री ठाकर आदी उपस्थित होते. वनिता तेंडुलकर पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात विविध क्षेत्रात महिलांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. पुरुषांच्या बरोबरीने विविध ठिकाणी महिला सेवा बजावत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. अशा भगिनींचा नवदुर्गा सन्मान सोहळा हा महाराष्ट्रात कुठेही झालेला नसून तो फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला आहे. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्य हे सामाजिक कार्य असून या संघटनेचा आदर्श इतर संघटनांनी घेऊन विविध कार्यक्रम राबवावेत तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा राबवाव्यात असे आवाहन केले. यावेळी गणेश चतुर्थीच्या काळात जिल्हा शिक्षकेतर संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणपती मखर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खालील महिलांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला. वनिता प्रभूतेंडोलकर राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार , प्रेरणा मेस्त्री शिरोडा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श प्राध्यापिका पुरस्कार, स्वप्नाली मुननकर दाभोली स्कूल संत मीराबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार, सुचिता दामोदर गायकवाड कणकवली आदर्श अध्यापिका पुरस्कार, संगिता सुरेश खडसे कोलझर हायस्कूल आदर्श लिपिक पुरस्कार, अंविता आप्पाजी सावंत आरपीडी हायस्कूल सावंतवाडी अहिल्याबाई होळकर आदर्श लिपिक पुरस्कार, आरती आत्माराम धारगळकर घोटेवाडी राणी लक्ष्मीबाई आदर्श चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी पुरस्कार, राजश्री राजेंद्र देसाई कळणे हायस्कूल आदर्श लिपिक पुरस्कार, अनुजा अनिल कानडे चेंदवण हायस्कूल शिक्षण कार्य तेज पुरस्कार, श्रद्धा शिवाजी कुलकर्णी पणदूर हायस्कूल विद्यार्थीप्रिय शिक्षक पुरस्कार, मयुरी महादेव तिळवे कोलगाव हायस्कूल जिद्द व तत्पर आदर्श चतुर्थश्रेणी कर्मचारी पुरस्कार, मनाली मकरंद नाईक तुळसुली हायस्कूल अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षिका पुरस्कार, अंकिता विलास मोडक पाट हायस्कूल डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रविणा प्रभाकर गवस पिकुळे हायस्कूल आदर्श चतुर्थश्रेणी कर्मचारी पुरस्कार, लक्ष्मी मोहन जाधव पिकुळे स्कूल आदर्श चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरस्कार, ज्योती सुनील पावसकर कळसुलकर हायस्कूल आदर्श शिक्षिका पुरस्कार, माधुरी रामदास खराडे भडगाव हायस्कूल खेलरत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार आदी पुरस्कार देऊन स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. विशेष पुरस्कार पुढीलप्रमाणे- घनश्याम गंगाधर राणे पेंडूर हायस्कूल जीवन योद्धा पुरस्कार, शशिकांत केशव परब मालवण जीवन योद्धा पुरस्कार, संभाजी यशवंत कोरे रेकोबा हायस्कूल मालवण-मालवण तालुका भूषण पुरस्कार, योगेश शिरीष गावित दोडामार्ग हायस्कूल तालुका भूषण पुरस्कार, लक्ष्मीकांत राजाराम गावडे सिंधुदुर्ग बँक रेडी आदर्श बँक व्यवस्थापक पुरस्कार, विवेक कमलाकर कळसुलकर पोखरण हायस्कूल आदर्श इतिहास तज्ञ पुरस्कार, तानाजी विष्णु साळसकर मळेवाड हायस्कूल साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, दत्ताराम भिकाजी मर्गज पांग्रड हायस्कूल आदर्श लिपिक पुरस्कार, मधुकर बयाराम खरवत ओटवणे हायस्कूल आदर्श चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरस्कार, विजय नारायण चव्हाण वाडोस हायस्कूल आदर्श चतुर्थश्रेणी कर्मचारी पुरस्कार, पांडुरंग रूक्मान्ना कोकित्कर वसोली हायस्कूल विद्यार्थीप्रिय शिक्षक पुरस्कार, विलास शिवराम जाधव मळगाव हायस्कूल आदर्श प्रयोगशाळा परिचर पुरस्कार, दिपक

अभिप्राय द्या..