You are currently viewing डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘ या संस्थेच्या सुसज्ज ‘ प्रशासकीय भवना ‘चा शिलान्यास सोहळा संपन्न..

डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘ या संस्थेच्या सुसज्ज ‘ प्रशासकीय भवना ‘चा शिलान्यास सोहळा संपन्न..

ओरोस /-

‘डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘ या संस्थेच्या सुसज्ज ‘ प्रशासकीय भवना ‘चा शिलान्यास सोहळा आज भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.ओरोस येथील ‘बिशप हाऊस ‘ च्या प्रशस्त आवारा त हे भवन उभारण्यात येणार असून गोव्यातील धर्मगुरू ‘ सांत जुझे वाझ ‘ यांचे नाव या भवनाला देण्यात येणार आहे.
सिंधदुर्गचे बिशप ऑलविन बरेटो यांनी धर्मगुरू म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज ४२ वर्षे पूर्ण झाली त्याचे औचित्य साधून हा शिलान्यास सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलतांना आमदार नितेश राणे म्हणाले, ‘ राजकीय कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून आपण आ कार्यक्रमाला आलेलो नाही ,तर बिशप बरेटो आणि राणे कुटुंबियांचे गेल्या अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आपण आज हे आमंत्रण स्वीकारले आहे’. ‘डायोसिस संस्था जिल्ह्यातील सामाजिक , शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करीत आहे ‘अशा शब्दात त्यांनी बिशप बरेटो आणि संस्थेचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलतांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनीही संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
कोरोना काळात जिल्ह्यात उत्तम सेवा बजावणाऱ्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा या वेळी शाल, पुष्पगुच्छ , व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना च्या काळात शेर्ले येथे सेवा केंद्र चालविणारे फादर सॅबेस्टियन रॉड्रीग्ज यांचा ‘कोरोना योद्धा ‘ म्हणून गौरव करण्यात आला.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग-कोल्हापूर हे तीन जिल्हे ‘डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘च्या कक्षेत येत असून तिन्ही जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्यविषयक जे कामकाज चालते त्याचे हे मुख्य कार्यालय असणार आहे.
जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी या उपक्रमाबद्दल संस्थेला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर,ओरोसच्या सरपंच प्रीती देसाई, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे,राकेश कांदे, राजू राऊळ, संतोष वालावलकर तसेच जिल्ह्यातील सर्व धर्मगुरू ,ओरोस ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबईचे प्रॉव्हिन्शियल फादर फिलिप्स गोंसालविस यांनी प्रास्ताविक भाषण केले तर फादर कॅजेटिन परेरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘डॉन-बॉस्को’ शाळेचे शिक्षक विनोद राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा