You are currently viewing शशिकांत इंगळे यांचा गोंधळी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार..

शशिकांत इंगळे यांचा गोंधळी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार..

कणकवली /-

भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शशिकांत इंगळे यांचा संपूर्ण गोंधळी समाजाच्या वतीने कणकवली येथील गोंधळी समाज नवरात्रोत्सवात सत्कार करण्यात आला. गोंधळी समाजातील युवा कार्यकर्ते शशिकांत इंगळे यांची अलीकडेच भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शशिकांत यांची झालेली निवड ही गोंधळी समाजाला अभिमानास्पद असून या संघटनेच्या माध्यमातून समाजघटकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी गोंधळी समाजाचे सल्लागार मल्लिक वाघमारे, बसवराज सुर्यवंशी, प्रभू कांबळे, शिवाजी भिसे, मर्याप्पा इंगळे, संतोष कांबळे, विनोद इंगळे आदी तसेच संपूर्ण गोंधळी समाज बांधव उपस्थित होते.

अभिप्राय द्या..