You are currently viewing शिवसेनेतून भाजपमद्धे गेलेल्या त्यातीन सदस्यांकडून मतदारांचा विश्वासघात.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांची टीका.

शिवसेनेतून भाजपमद्धे गेलेल्या त्यातीन सदस्यांकडून मतदारांचा विश्वासघात.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांची टीका.

प्रवेशकेलेल्या तिन्ही सदस्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांचे आवाहन..

कुडाळ /-

शिवसेनेतून भाजपमद्धे गेलेल्या त्या तीन सदस्यांकडून मतदारांचा विश्वासघात केला आहे अशी टीका शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.भजपमद्धे गेलेल्या त्या सदस्यांची ओळख ही ‘शिवसेना’ या चार अक्षरांमुळेच होती.त्या तिघांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि मगच शिवसेनेवर बोलावे.प्रत्येक सदस्यांच्या मतदारसंघात भरघोस विकास कामे झाली आहेत.त्यांनी आपल्या मतदारसंघात फिरून पाहावे.विकास झाला की नाही हे त्या मतदारानां माहीत आहे. शिवसैनिकांचा त्यांवर विश्वास देखील आहे.शिवसेनेच्या तिकिटावर निवडून यायचे आणि आणि स्वार्थासाठी आणि लोभापाई भाजप मद्धे प्रवेश करणे हेच यांचे काम आहे.प्रवेश केलेल्या या तीन सदस्यांना थोडी जरी ,लाज असेल तर त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावे असे आवाहन राजन नाईक यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..