You are currently viewing नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन..

नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन..

कणकवली /-

१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारतभर “स्वच्छ भारत अभियान” राबविले जात आहे. या अभियानाचा भाग होत नेहरु युवा केंद्रमार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. कणकवली तालुक्याचे समन्वयक अक्षय मोडक आणि वर्षा केसरकर तसेच देवगड तालुक्याची समन्वयक रिना दुधवडकर यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली.

या स्वच्छता कार्यात वामनराव महाडिक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपले योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपली जावी तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी नेहरु युवा केंद्र सतत विविध उपक्रम राबवित असते.

अभिप्राय द्या..