You are currently viewing विनापरवाना बंदुक घेऊन फिरणाऱ्या मालवणमधील दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

विनापरवाना बंदुक घेऊन फिरणाऱ्या मालवणमधील दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

मालवण /-

विनापरवाना ठासणीची बंदुक घेऊन फिरणाऱ्या बिळवस भोगलेवाडी येथील हरी ऊर्फ रामचंद्र शशिकांत भोगले (वय २७) व गणेश अनिल भोगले (वय १८) या दोघा युवकांविरोधात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मालवण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मालवण पोलिस पथकाने दोघाही संशयितांना ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी गुरुवारी सायंकाळी दिली आहे.

बिळवस भोगलेवाडी मार्गावर बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक गस्त घालत असताना रामचंद्र भोगले आणि गणेश भोगले हे दोन युवक मध्यरात्री ठासनीची बंदुक घेऊन दुचाकीवरून फिरत असल्याचे दिसून आले. त्या युवकांचा पाठलाग केला असता युवकांनी बंदुक रस्त्यावरच टाकून पळ काढला. याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. युवकांचा शोध सुरू करण्यात आला.

युवकांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून त्यांच्या अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी गुरुवारी सायंकाळी दिली आहे. पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

अभिप्राय द्या..