You are currently viewing मळेवाड जंक्शनयेथे अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त..

मळेवाड जंक्शनयेथे अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त..

सावंतवाडी /-

मध्यरात्रीच्या सुमारास मळेवाड जकात नाका सर्कल जवळील विद्युत पोलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्युत पोल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे सगळीकडे विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच त्या पोल सोबत असलेले आजूबाजूचे विद्युत पोलही वाकून विद्युत तारा जमिनीवर आल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. मात्र ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येता त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा केंद्राला कळविले. विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला, मात्र याचा मनस्ताप ग्रामस्थांना बसला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..