You are currently viewing वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे माजी कार्यवाह श्रीधर गोगटे यांचे निधन..

वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे माजी कार्यवाह श्रीधर गोगटे यांचे निधन..

वेंगुर्ला /-


वेतोरे भिवजीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ, सेवानिवृत्त ग्रामसेवक, गोगटे मंगल कार्यालयाचे मालक, वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे माजी कार्यवाह,श्री सातेरी सहकारी सेवा संस्थेचे माजी संचालक आणि श्रीदेवी सातेरी देवस्थान व्यवस्थापन उप समितीचे माजी खजिनदार श्रीधर गोविंद गोगटे (वय ८२) यांचे बुधवार ६ ऑक्टोबर रोजी वृध्दापकाळाने राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,३ मुली, सून, जावई, नातवंडे, चार भाऊ, भावजया, पुतण्या, पूतणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधना नंतर समाजातील विविध स्तरावरील अनेक मान्यवरांनी त्यांचे अत्यदर्शन घेतले.चित्रकार तथा मूर्तीकार गिरीष गोगटे, वेंगुर्लेच्या माजी उपसभापती तथा पं. स. सदस्या, भाजपाच्या वेंगुर्ले तालुका महिलाध्यक्षा स्मिता दामले यांचे ते वडील, राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते आणि वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे संचालक शिवराम गोगटे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

अभिप्राय द्या..