You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत चिपी,परुळे सरपंच यांना डावलले..

सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत चिपी,परुळे सरपंच यांना डावलले..

कुडाळ /-

चिपी येथील सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या उद्घाटनाची पूर्ण तयारी झाली आहे ९ ऑक्टोंबर रोजी या विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरणार आहे पण ज्या भूमीवर हे विमान उतरणार आहे त्या भूमिपुत्रांना मात्र उद्घाटन प्रसंगी कोणताही सन्मान देण्यात आलेला नाही या निमंत्रण पत्रिकेत चिपी व परुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा नामोल्लेख नाही तसेच त्यांना या उद्घाटनासाठी आजमिती पर्यंत साधे निमंत्रणही एमआयडीसी आणि आयआरबी कंपनीकडून देण्यात आलेले नाही या उद्घाटनाप्रसंगी भूमिपुत्रांचा विसर पडल्याने दोन्ही गावांच्या ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विमानतळ झाले. या विमानतळावर कधी विमान उतरणार याची उत्सुकता जिल्हावासीयांना आहे. या विमानतळासाठी चिपी गावातील ६० टक्के तर परुळे गावातील ४० टक्के क्षेत्र घेण्यात आले आहे त्यामुळे या विमानतळाच्या उभारणीत या दोन्ही गावातील ग्रामस्थांचा तेवढाच मोठा हात आहे. विमानतळ पूर्ण होईपर्यंत या गावातील ग्रामस्थांकडून आवश्यक असलेल्या परवानग्या ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या पण आता या भूमिपुत्रांना प्रशासन आणि कंपनी विसरलेली दिसून येत आहे सिंधुदुर्ग विमानतळाचे अधिकृत उद्घाटन ९ ऑक्टोंबर रोजी करण्याचे एमआयडीसी व आयआरबी कंपनीने ठरविले यासाठी निमंत्रण पत्रिका ही निश्चित करण्यात आली पण या निमंत्रण पत्रिकेत कुठेही भूमिपुत्रांना सन्मान देण्यात आलेला नाही ज्या दोन गावांमध्ये हे विमानतळ आहे त्या चिपी व परूळे गावच्या सरपंचांना अद्याप पर्यंत निमंत्रण नाही. तसेच निमंत्रण पत्रिकेत त्यांचा नामोल्लेख सुद्धा नाही मुळात सरपंच हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे ग्रामपंचायत म्हणजे मिनी मंत्रालय असे म्हटले जाते आणि त्या गावच्या प्रमुखालाच निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले हा राजशिष्टाचाराचा अवमानच म्हणावा लागेल.

सरपंच हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या प्रणित पॅनलचा आहे हे महत्त्वाचे नाही तर तो गावचा प्रमुख आहे हे महत्वाचा आहे आणि या गावाच्या प्रमुखाला निमंत्रण पत्रिकेतून डावलण्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे याबाबत माहिती घेतली असता चिपी गावचे सरपंच गणेश तारी हे आहेत तर परुळे गावच्या सरपंच श्वेता चव्हाण या आहेत या दोघांशीही चर्चा केली असता आज मिती पर्यंत कोणत्याही प्रकारचे निमंत्रण प्रशासनाकडून आलेले नाही तसेच निमंत्रण पत्रिकेत ही सरपंच म्हणून नाव नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..