You are currently viewing स्वच्छतेत वेंगुर्ले तालुक्याचे नाव उज्वल करा.;सभापती अनुश्री कांबळी..

स्वच्छतेत वेंगुर्ले तालुक्याचे नाव उज्वल करा.;सभापती अनुश्री कांबळी..

वेंगुर्ला /-


स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या सरपंच,ग्रामसवेक,स्वच्छताग्रही,आशा,अंगणवाडी सेविका यांचा सत्कार सोहळा आज पंचायत समिती वेंगुर्ले येथे आयोजित करणेत आला होता.वेंगुर्ले तालुक्यात स्वच्छभारत कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्याचे काम उल्लेखनिय आहे,असे गौरोवोदगार सभापती अनुश्री कांबळी यांनी काढले. यावेळी सभापती अनुश्री कांबळी,गट विकास अधिकारी उमा पाटील,पंचायत समिती सदस्य मंगेश कामत,विस्तार अधिकारी संदेश परब,कृषि अधिकारी कविटकर,गट समन्वयक द्रौपदी नाईक,अश्विनी किनळेकर व सर्व सरपंच,ग्रामसवेक,स्वच्छताग्रही,आशा,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा