You are currently viewing महात्मा गांधींचे विचार सर्वांना मार्गदर्शक ; प्रा.डॉ.विलास देऊलकर

महात्मा गांधींचे विचार सर्वांना मार्गदर्शक ; प्रा.डॉ.विलास देऊलकर

वेंगुर्ला /-


बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात आज महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप शितोळे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेता जागतिक पातळीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधींचे विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतील,असे मत डॉ.विलास देऊलकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास सांस्कृतिक समितीचे चेअरमन प्रा.वामन गावडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड,प्रा.लक्ष्मण नैताम,प्रा.मनिषा मुजुमदार, देशपांडे, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा