You are currently viewing भेडशी विश्रामग्रुह येथे शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक संपन्न..

भेडशी विश्रामग्रुह येथे शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक संपन्न..

दोडामार्ग /-

आज साटेली भेडशी येथील विश्रामग्रुहामध्ये शिवशंभू प्रतिष्ठान ची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी योग्य ते यावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यकारणीची सुरुवात आज दोडामार्ग तालुक्यातून केली जात असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी प्रविण गवस यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी तुषार देसाई यांची जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी जाहीर निवड केली. यावेळी सिद्धेश पांगम, गोविंद शिरसाट,विजय कांबळे, सूर्याजी झेंडे,पंकज गवस, अनिल कांबळे,अमित गवस, विशाल गवस, हेमंत कांबळे,संतोष कांबळे,आकाश चारी आदी सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..