You are currently viewing जगातील सर्वात श्रेष्ठ विचारवंत राष्ट्रपिता महात्मा गांधी ; डॉ. सई लिंगवत

जगातील सर्वात श्रेष्ठ विचारवंत राष्ट्रपिता महात्मा गांधी ; डॉ. सई लिंगवत

वेंगुर्ला /-


जगातील सर्वात श्रेष्ठ विचारवंत,म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रासाठी महनीय व्यक्ती असून त्यांच्या अहिंसावादी लढ्याचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. अहिंसा या तत्वाचा व्यापक विचार असून शारीरिक अहिंसे सोबत अलीकडे समाजात वाढत चाललेली शाब्दिक अपमानस्पद वागणूक देणे ही मानसिक अहिंसा थांबली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने नवीन पिढीसमोर महात्मा गांधींचा आदर्श आणता येईल, असे प्रतिपादन डॉ. सई लिंगवत यांनी उभादांडा, वेंगुर्ले उपकेंद्र क्र. २ येथे गांधी जयंती प्रसंगी केले.यावेळी आरोग्य सेविका स्मिता दळवी, आशा सेविका दिपाली वराडकर, आशासेविका निकिता घोंगे, आशा सेविका कल्पिता गिरप, स्त्री परिचर श्रेया कापडोस्कर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा