You are currently viewing वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिरे दरवाढ<br>आचरादशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिरे दरवाढ
आचरादशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

आचरा-

वाढते इंधनभार,वीज बील,मजूरी,राँयल्टी मध्ये झालेली वाढ याचा फटका चिरेखान व्यावसायिकांना बसत असून चिरेखानी पासून सुमारे वीस किलोमीटर परीसरात चिरयाचा दर पंचवीस रुपये प्रती याप्रमाणे देण्याचा ठरला.याबाबत ग्राहकांनी, व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आचरा दशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यांनी केले आहे.
आचरा दशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेची सभा बाबू हडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी आचरा येथे संपन्न झाली. यावेळी सचिव दुर्गा प्रसाद तुळपुळे,विकास हडकर, अजय साटम,प्रकाश मेस्त्री, निलेश कांबळी,नितीन गायतोंडे,निलेश पांजरी आदी चिरेखान व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत वाढलेल्या राँयल्टी व इंधन दरवाढीमुळे व्यवसाय करताना आर्थिक फटका बसत आहे. कामगारांची मजूरी ही वाढली आहे. यामुळे सद्य स्थितीत चिरयाचा दर वाढविणे आवश्यक बनला आहे. याबाबत चर्चे अंती सर्वानुमते वीस किलोमीटर परीसरात प्रती चिरा पंचवीस रुपये दराने देण्याचे ठरविण्यात आले. यासाठी ग्राहकांनी ,समव्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा