You are currently viewing तरंदळे येथे बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात..

तरंदळे येथे बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात..

कणकवली /-

तरंदळे येथे अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच ४०० रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास केली.

तरंदळे येथील विजय लाडोबा परब (वय ६२) हा बेकायदेशररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या जवळील ४०० रुपये किंमतीची दारु ही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रुपेश गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा