नवी दिल्ली /-
लोकसभेत मंजूर केलेली तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. राज्यसभेत भाजपाचं संख्याबळ कमी असल्याने विधेयकांचं काय होणार, असा प्रश्न आहे. या विधेयकांवरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. तीन विधेयकांवरून काँग्रेसने मोदी सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. “
टीका शेतकरीविरोधी तीन काळे कायदे भाजपाने पक्षादेश (व्हिप) काढून मंजूर करेल, पण त्यांच्याकडे एकही उत्तर नाही,” अशी टीका काँग्रेसने केली आहे.,आरोप शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप या विधेयकांवर होत आहे.,आक्रमक : या विधेयकांच्या मुद्यावरूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या विधेयकांवरून पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत.
*प्रश्न* :
*1)* १५.५० कोटी शेतकऱ्यांना एमएसपी कसा मिळेल, तो कोण देणार?,
*2)* सरकार एमएसपीची कायदेशीर जबाबदारी देण्याापासून का पळत आहे?,
*3)* बाजार समित्यांच्या बाहेर एमएसपीची मिळण्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून विचारले आहे.