Corona : १०६ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात…

Corona : १०६ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात…

आनंदीबाई पाटील या १०६ वर्षीच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. परंतु डोंबिवली येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून घेतले आणि आज उपचाराअंती आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांचेवर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अभिप्राय द्या..