▪️देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या ७ राज्यातील मुख्यमंत्र्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार २३ रोजी ऑनलाईन संवाद.

▪️देशात गेल्या २४ तासात ९२ हजार ६०५ नवे रुग्ण सापडले तर ११३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.

▪️गेल्या २४ तासात राज्यातील २३ हजार ५०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी बरे होणार्यांचे प्रमाण अधिक.

▪️राज्यात आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२. २२ टक्क्यांवर.

▪️महाराष्ट्रातील २०११ कैद्यांना तर ४१६ तुरुंग कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. आत्तापर्यंत ६ कैदी आणि ४ कर्मचारी मृत्यू पावले.

▪️राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात आवाजी मतदान घेत कृषीविषयक विधेयक मंजूर करण्यात आले.

▪️जम्मू काश्मीरमधे सिमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सिमेवरिल अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्र तस्करीचा पाकिस्तानचा डाव उधळवला.

▪️महाराष्ट्रातील सरकारने जाहीर केलेल्या पोलिस भरतीत मराठा समाजातील तरुणांना १३ टक्के संधी मिळणार. गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.

▪️राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी – सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला अलर्ट.

▪️उध्दव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बदलली. मला महाराष्ट्रात सेफ वाटतं :- अनुराग कश्यप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page