IPL च्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर पाच गडी राखून विजय..

IPL च्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर पाच गडी राखून विजय..

दुबई /-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL २०२०चा पहिला सामना दुबईमध्ये रंगला. मुंबई इंडीयन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. सौरभ तिवारीच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू आणि फॅफ ड्यु प्लेसिस हे दोन्ही अनुभवी खेळाडू यावेळी चेन्नईच्या विजयाचे मानकरी ठरले.

रायुडूने यावेळी ४८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी केली. रायडू बाद झाल्यानंतर खेळाची संपूर्ण जबाबदारी फॅफने पेलली.

अभिप्राय द्या..