ओरोस स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे १०० बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती करावी;आ.वैभव नाईक

ओरोस स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे १०० बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती करावी;आ.वैभव नाईक

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या पहिल्या स्टेज मध्ये असलेल्या रुग्णांसाठी ओरोस मधील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे आणखी एका १०० बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती करावी. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या ओरोस येथील जिल्हा कोविड रुग्णालयात ३५०पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत.उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहेत. कोविडची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबई बिकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या धर्तीवर ओरोस येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये १०० बेडच्या स्वतंत्र कोविड सेंटर ची उभारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

अभिप्राय द्या..