You are currently viewing भाजपतर्फे २ ऑक्टोबर रोजी<br>वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सत्कार

भाजपतर्फे २ ऑक्टोबर रोजी
वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सत्कार

वेंगुर्ला
वजराट गावातील हातमाग कारागीर यांचा सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती दिनी सायंकाळी ३.३० वा. वजराट येथे सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावर्षी सेवा समर्पण सप्ताह साजरा करीत आहे.भाजपा सरकारच्या कालावधीत विविध योजना लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय उद्योग खाते आहे.या खात्याचा उपयोग गावातील विविध घटकांना व्हावा,सिंधु आत्मनिर्भर योजनेंतर्गत सर्वांना एकत्र करुन योजनेचा फायदा होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजन तेली,आय. टी. सेलचे सतिश निकम,कोकण विभागाचे संयोजक जितेंद्र डाकी,दिलीप गिरप,मनिष दळवी,सुहास गवंडळकर आदी उपस्थित राहणार आहेत.उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..