You are currently viewing भाजपाच्या वतीने गांधी जयंती निमित्त शिरोडा येथील नियोजित गांधी स्मारक येथे स्वच्छता अभियान व तिरंगा यात्रेचे आयोजन

भाजपाच्या वतीने गांधी जयंती निमित्त शिरोडा येथील नियोजित गांधी स्मारक येथे स्वच्छता अभियान व तिरंगा यात्रेचे आयोजन

वेंगुर्ला
वेंगुर्ले भाजपा च्या वतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठीकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी म्हणजे नियोजित गांधी स्मारक येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन तसेच तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता रेडी जि.प.विभागाची बैठक भाजप शिरोडा शहर कार्यालय शिरोडा चव्हाटावाडी येथे घेण्यात आली
या सभेमध्ये तालुक्याच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर उपस्थित होते. या सभेमध्ये तालुक्याच्या वतीने शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक या ठिकाणी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन त्यानंतर वंदन करुन त्या परिसराची स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. त्या नंतर या ठिकाणाहून शिरोडा बाजारपेठ,बायपास पर्यत तिरंगा यात्रा(बाइक रॅली) काढण्याचे ठरविण्यात आले. बाइक रॅली साठी सभेमध्ये उपस्थित असलेले रेडी जि.प.विभागातील रेडी,शिरोडा,आरवली,सागरतीर्थ तसेच आसोली,न्हैचीआड, अणसुर,मोचेमाड या भागातील भाजपा पदाधिकारी यांना निमंत्रित करावे असे ठरविण्यात आले.यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, विभागीय अध्यक्ष अमित गावडे, आसोली,शिरोडा,रेडी, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर,विदयाधर धानजी,जगन्नाथ राणे,आय. टी.सेलचे केशव नवाथे,शिरोडा शहर अध्यक्ष संदीप धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,सरचिटणीस सुरेश म्हाकले,तालुका महिला मोर्चा च्या गंधाली करमरकर , युवा मोर्चा अध्यक्ष सोमकांत सावंत, बुथ अध्यक्ष जयानंद शिरोडकर, भाजप शिरोडा पदाधिकारी अनिल गावडे,राजेंद्र भोपाळकर,रेडी भाजप पदाधिकारी गजानन बांदेकर,देवेंद्र मांजरेकर, तसेच सागरतीर्थ भाजप पदाधिकारी टेमकर,शिरोडा, रेडी,आरवली येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..