You are currently viewing कुर्ली भातडेवाडी येथील रहिवासी दत्ताराम कदम यांचे निधन..

कुर्ली भातडेवाडी येथील रहिवासी दत्ताराम कदम यांचे निधन..

वैभववाडी/-

कुर्ली भातडेवाडी येथील रहिवासी दत्ताराम बळवंत कदम वय 95 यांचे राहत्या घरी मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.आण्णा या टोपण नावाने ते गावामध्ये परिचित होते.दर वर्षी पंढरीची वारी त्यांनी अनेक वर्षे न चुकता केली होती.जुन्या पिढीतील नामवंत बरकंदार म्हणून कुर्ली दशक्रोशीत ते प्रसिद्ध होते.

पंचक्रोशीत अडीअडचणीच्या वेळी अनेकांना आर्थिक मदत करून सहकार्य केले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कांदिवली,चारकोप येथील
सोहम डेव्हलपरर्स व सागर कन्स्ट्रक्शनचे मालक दीपक कदम व आबासाहेब कदम यांचे ते वडील होत. मंगळवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात यांची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली.त्यानंतर कुर्ली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील शेकडोंच्या संख्येने लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,सात मुलगे ,चार विवाहित मुली,सुना, जावई,नातवंडे,पतवंडे असा मोठा परीवार आहे.

अभिप्राय द्या..