You are currently viewing उद्या १ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन..

उद्या १ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन..

वेंगुर्ला /-

आधार फौंडेशन,सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने दिनांक 01/10/2021 रोजी सांय. 4 ते 5 या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यास सन्माननीय श्री. आर पी जोशी सर, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला यांची विशेष उपस्थिती राहणार असून निवडक शासकीय अधिकारी व निमंत्रित मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत महत्वाच्या तरतुदी, न्यायाधिकरण बाबतची अद्ययावत माहिती, कायदे व नियम/शासन निर्णय यांची सविस्तर माहिती तज्ञ व्यक्ती मार्फत देण्यात येणार आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीची सेवा आणि माहितीसाठी शासकीय मोफत राष्ट्रीय हेल्पलाईन सुविधा – 14567 बाबतची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे तरी वेंगुर्ला तालुक्यातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांनी सदरील उपक्रमास उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे असे आवाहन श्रीम. माधुरी वेंगुर्लेकर, अध्यक्षा- आधार फौंडेशन, सिंधुदुर्ग व डॉ. वंदन वेंगुर्लेकर, अध्यक्ष- कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.सदरील कौटुंबिक उपक्रम शासकीय सर्व कोविड नियमांचे पालन करून होणार असून मास्क लावून येणे बंधनकारक असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच उपक्रमाबाबत अधिक माहिती करिता श्री. नंदन वेंगुर्लेकर -9422434356 यांच्याशी संपर्क साधावा.

अभिप्राय द्या..