वेंगुर्ला
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) हि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे.वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्या अनुषंगाने २६ ते २/१०/२०२१ पर्यंत स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता व पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी दि २/१०/२०२१ रोजी स्वच्छतेचे प्रेरणास्थान महात्मा गांधी व लाल लहादूर शास्त्री जयंती याचे औचित्य साधून सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, हि सायकल यात्रा २/१०/२०२१ रोजी सकाळी ७ वाजता नगरपरिषद कार्यालय वेंगुर्ला येथून सुरु होऊन बॅ. खर्डेकर मार्गे हॉस्पिटल नाका, कॅम्प, राऊळवाडा, पिराचा दर्गा,जुना बस स्टँड, दाभोली नाका, बाजारपेठ मधून वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथे संपणार आहे. या सायकल यात्रेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सायकल क्लब, कार्यालय व नागरिक यांनी उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा व स्वच्छतेच्या या जनजागृती मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदतर्फे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page