You are currently viewing गुलाब चक्रीवादळाबाबत मोठी बातमी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी..

गुलाब चक्रीवादळाबाबत मोठी बातमी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी..

मुंबई /-

▪️ गुलाब चक्रीवादळाची लॅंडफॉलची प्रक्रिया रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पूर्ण झाली आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 82 किमी कायम असल्याची माहिती आहे.

▪️ दरम्यान, काही तासात चक्रीवादळ तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. त्यानंतर वाऱ्यांचा वेग कमी होणार असल्याची माहिती आहे.

▪️ यामुळे आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

▪️ आजसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.

▪️ जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▪️परतीचा पाऊस धुवून काढणार असा इशारा भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी ट्वीटरवरुन दिला आहे. याचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्रात दिसणार आहे.

▪️ ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

● आज राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..