You are currently viewing सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामस्थळाला पंतप्रधानांची अचानक दिली भेट..

सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामस्थळाला पंतप्रधानांची अचानक दिली भेट..

नवी दिल्ली /-

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा अचानक दौरा केला.

▪️तिथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या इंजिनियर्सकडून नवे संसद भवन आणि इतर कामांचा आढावा घेतला.

▪️ वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 8.45 च्या सुमारास सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम स्थळी पोहोचले. त्यांच्या येण्याची माहिती आधी कुणालाही नव्हती.

▪️सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी या दरम्यान, सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते.

▪️राजधानी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची निर्मिती होत आहे. नव्या संसद भवनाचे बांधकाम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर काम सुरू आहे.

▪️दरम्यान, या पार्श्वभूमीवरच मोदींनी या नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे एक तास घालवला आणि वैयक्तिकरित्या इमारतीच्या बांधकाम स्थितीची पाहणी केली.

अभिप्राय द्या..