You are currently viewing इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरले; मुंबईहून- पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत..

इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरले; मुंबईहून- पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत..

मुंबई /-

▪️ इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

▪️ ही घटना आज घडली असून रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.

▪️मुंबईहून पुण्याला येणाऱ्या इंदूर एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकात रुळावरुन घसरल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

▪️ गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

▪️ इंदूर एक्सप्रेस सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

अभिप्राय द्या..