You are currently viewing पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल सलग ३ दिवस दरवाढ..

पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल सलग ३ दिवस दरवाढ..

मुंबई /-
आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये आज सोमवारी सलग २२ व्या दिवशी पेट्रोलचे दर १०१.१९ रुपये प्रती लिटरवर स्थीर आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये २५ पैशांची वाढ झाल्याने ते ८९.३२ रुपये प्रती लिटरवर पोहचले आहेत.

मुंबईमध्येही प्रति लिटर पेट्रोलसाठी १०७.२६ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर मात्र शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.देशभरात मागील ४ दिवसांमध्ये डिझेलचा भाव तिनदा वाढलाय.तीन दिवसांमध्ये डिझेल लिटरमागे ७० पैशांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी तर २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचा प्रति लिटर दर वाढवला होता. आज सलग तिसऱ्या दिवशी २५ पैशांनी डिझेलचा दर वाढवण्यात आलाय. डिझेल सप्टेंबर महिन्यामध्ये ७० पैशांनी महागलं आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

अभिप्राय द्या..