You are currently viewing सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्याना दिले जाणारे पुरस्कार जाहीर..

सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्याना दिले जाणारे पुरस्कार जाहीर..

वैभववाडी /-

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी दिले जाणारे शेती व शेतीपूरक व्यवसाय मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी चा उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून कोकिसरे येथील अनंत वसंत मिराशी यांना तर काजू शेतकरी म्हणून एडगाव वायबोशी येथील रुक्मिणी पांडुरंग शेळके तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सोनाळी येथील अरविंद भास्कर रावराणे तर प्रयोगशील शेतकरी म्हणून तिथवली येतील गुलजार निजाम काझी यांना तर पशुपालक शेतकरी म्हणून नाधवडे येथील श्वेताली श्रीकृष्ण गवस यांना जाहीर झाला असून 28 सप्टेंबर रोजी वैभववाडी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी आज जाहीर केले. या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा