चौके येथे दुचाकीचा भीषण अपघात.;एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी..

चौके येथे दुचाकीचा भीषण अपघात.;एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी..

चौके/

चौके बाजारपेठ येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या दिशेने जाणाऱ्या MH 07 A -N2161 या दुचाकीचा बाजारपेठेतील वळणावर अपघात झाला. रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला व दुचाकीवरील दोन तरुण रस्त्यावर फेकले गेले अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले दोन तरुण दिसून आले. स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी मदतकार्य सुरू करून तात्काळ रुग्णवाहिका बोलाविली मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.

गणेश सुरेश भोसले (वय २६) असे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो सांवंतवाडी न्यू सबनिसवाडा, येथील असल्याचे मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले तर हरिश परब, राहणार आचरा डोंगरेवाडी, हा गंभीर जखमी झाला. जखमीला १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर अपघात घडताच चौके सरपंच राजा गावडे, संतोष गावडे, नितीन गावडे बंड्या गावडे, मंदार गावडे, गोट्या गावडे, मयुर गावडे, ऋषी पवार, प्रविण चौकेकर, गुरु चौकेकर, आणि चौके ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले. मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिसांचा तपास चालू आहे.

अभिप्राय द्या..