You are currently viewing कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात प्रशासनच कमी पडले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली खंत

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात प्रशासनच कमी पडले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली खंत

कुडाळ /-

कुडाळ शहरातील तुपटवाडी येथे असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली आणि या समाजाची परिस्थिती पाहून प्रशासनच आपल्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडले आहे तुमच्या राहणीमानावरून दिसून येत आहे पण यापुढे असे होणार नाही तुम्हाला समाजात जगण्याचा अधिकार आहे आणि तो चांगले शिक्षण, आरोग्य आणि पक्की निवास स्थानामध्ये.
कुडाळ तुपटवाडी येथील कातकरी समाजाच्या वस्तीवर कुडाळ पंचायत समितीच्या मार्फत या वस्तीतील सर्वांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते तसेच कोविड प्रतिबंध लसीकरण करण्यात आले यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली या ठिकाणी असलेल्या कातकरी समाजाच्या झोपड्यांची परिस्थिती पाहिली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले की, या ठिकाणी ज्या पद्धतीचा समाज राहतो ते पाहून हा समाज विकासापासून किती दूर आहे हे दिसून येते याठिकाणी प्रशासनच योग्य प्रकारे आले नाही त्यामुळे या समाजाची अशी परिस्थिती आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. असे त्यांनी सांगितले.यावेळी तरी समाजाच्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आम्हाला चांगली घरे स्वच्छ शौचालय आणि आमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या म्हणजे आमचे जीवन सफल झाले असे आम्ही मानू आम्ही जे भोगले ते आमच्या मुलांनी बघू नये चांगले शिक्षण मिळाले तर आमची मुलेही चांगल्या पदावर काम करतील असे त्यांना सांगितले.

अभिप्राय द्या..