कुडाळ तालुक्यात वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त.;तहसिलदार अमोल पाठक यांची माहिती..

कुडाळ तालुक्यात वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त.;तहसिलदार अमोल पाठक यांची माहिती..

कुडाळ /-

गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यात महसूल विभागाने आयोजित केलेल्या वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त झाल्याचे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले. 
कुडाळ तालुक्यांमध्ये गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून आणि चाकरमान्यांना वारस तपास करता यावेत म्हणून महसूल कार्यालयामार्फत कुडाळ तालुक्यात १० मंडळ कार्यालयांमध्ये वारस तपास शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये एकूण १६२ वारस तपासाचे अर्ज दाखल झाले असून कुडाळ १३, झाराप १९, कसाल १५, माणगाव ३७, मडगाव १४, ओरोस ८, गोठोस १६, वालावल १३, कडावल ७, पिंगळी २० असे एकूण १६२ अर्ज प्राप्त झाल्याचे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..