You are currently viewing रोटरी क्लब नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 40 वर्षावरील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी..

रोटरी क्लब नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 40 वर्षावरील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी..

सावंतवाडी /-

रोटरी क्लब, उपजिल्हा रुग्णालय, यशराज हॉस्पिटल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 40 वर्षावरील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत उपजिल्हा रुग्णालय व बॅ. नाथ पै संकुल प्रवेशद्वार येथे केली जाणार आहे. यावेळी परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रोटरी अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील सुमारे 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. कोरोनाच्या काळात या आजाराचा आणखी जोर वाढला आहे. यासाठी रोटरी इंडिया आणि रिसर्च सोसायटी फॉर दि स्टडी ऑफ डायबिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर रोजी 10 लाख तपासण्या करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. 40 वर्षावरील सर्व नागरीकांनी मधुमेह तपासणी करावी असे आवाहन साईप्रसाद हवालदार व सत्यजित धारणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा