You are currently viewing हुंबरट येथून विवाहिता बेपत्ता…

हुंबरट येथून विवाहिता बेपत्ता…

कणकवली /-

हुंबरट – घोरपीवाडी येथील दीपाली दीपक होळकर (३१) या विवाहिता १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. याबाबतची फिर्याद तिचा पती दीपक राजाराम होळकर यांनी पोलिसात दिली आहे.

तरंदळे – शिक्षक कॉलनी मधील घरमालक शिंदे यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून दीपाली होळकर घरकामाला जात होत्या. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामाला जाते म्हणून सांगून गेल्या. त्या नंतर घरी परतल्या नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

दीपाली होळकर यांची उंची ४ फूट ५ इंच, वर्ण गोरा, चेहरा गोल, बांधा सडपातळ असून त्यांनी निळ्या रंगाची सहावारी साडी नेसली आहे. या वर्णनाची स्त्री आढळल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा