You are currently viewing त्रिंबक येथील ऐश्वर्या साटमचा<br>सत्कार!आचरा ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

त्रिंबक येथील ऐश्वर्या साटमचा
सत्कार!आचरा ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

मसुरे /-

त्रिंबक बागवेवाडीतील कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांना शेतीकामात मदत करत यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये न्यु इंग्लिश स्कुल आचराया कनिष्ठ विद्यालयामधुन कॉमर्स शाखेतून पहिला येण्याचा मान प्राप्त केला. तिच्या यशा बद्दल बागवेवाडीतील ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे यथाशक्ती मदत गोळा करून श्री प्रकाश साटम यांचे घरी जाऊन वयोवृद्ध ग्रामस्थ श्री अरुण बागवे यांचे हस्ते ७५०१ रुपयांचा धनादेश शिक्षणासाठी खारीचा वाटा म्हणुन कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम हिचे जवळ सुपूर्त केला. आणि तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुरेंद्र सकपाळ व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..