You are currently viewing संकल्प ५ हजार औषधी व फळ झाडांच्या वृक्षारोपणाचा!स्वामी समर्थ मठ आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचा शंभर झाडे लावून शुभारंभ..

संकल्प ५ हजार औषधी व फळ झाडांच्या वृक्षारोपणाचा!स्वामी समर्थ मठ आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचा शंभर झाडे लावून शुभारंभ..

मसुरे /-

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड आणि सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीने आज खाकशीतिठा देवगड येथील शेतकरी श्री.मधुकर भडसाळे यांच्या जमीनीवर शंभर वेगवेगळी फळझाडे व औषधी झाडे लावण्यात आली.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड ही संस्था समाजोपयोगी उपक्रम सतत राबवीत असते. रक्तदान शिबिर, विध्यार्थी दत्तक योजना, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिर अशा उपक्रमातून संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पडीक आहे व लागवड करणे आर्थिकदृष्टया शक्य होत नसेल अशा शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने मोफत वृक्ष लागवड करून देण्यात येणार आहे. संस्थेने पर्यावरण बाबत जगरूकता दाखवत पाच हजार झाडे लावण्याच्या उपक्रमास स्वामी कृपेने प्रारंभ केला असून यापुढील काळात आम्ही निश्चित ध्येया पर्यंत पोहोचू असे प्रतिपादन यावेळी संस्थापक विश्वस्त नंदकुमार पेडणेकर यांनी केले.

अभिप्राय द्या..