You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा उद्या सन्मान

वेंगुर्ले तालुक्यात बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा उद्या सन्मान

वेंगुर्ला /-


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पर्यंत बुथरचना परिपूर्ण करण्याचे लक्ष प्रदेश भाजपा ने दिले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले भाजपा ने ९३ ही बुथ गठीत केले आहेत.
त्यामुळे शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष राजन तेली व बुथ अभियान जिल्हा संयोजक महेश सारंग यांच्या हस्ते तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता कार्यालयात उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.९३ पैकी ९३ असे १०० % बुथ रचना पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले हा एकमेव तालुका बनला आहे.

अभिप्राय द्या..