You are currently viewing तुळस वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण माळकर

तुळस वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण माळकर

वेंगुर्ला /-


तुळस श्री देव जैतीराश्रित संस्था मुंबई संचलित श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय,तुळस या ग्रामीण भागातील आठ दशकांहून जास्त काळ सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण विठ्ठल माळकर यांची पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली.वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते माळकर यांच्या मागील कार्याचा आढावा घेत सर्वानुमते पुनःश्च निवड करण्यात आली.सन २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी वाचनालय उपाध्यक्षपदी वासुदेव(सुधीर) मधुकर झाट्ये,कार्यवाह जयवंत शंकर तुळसकर व प्रकाश पुरुषोत्तम परब खजिनदार अशी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर कालावधीसाठी कार्यकारणी सदस्य म्हणून मंदार तुळसकर, रामचंद्र परब,सुजाता पडवळ,श्रद्धा गोरे, संजीवन तुळसकर, प्रा.सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर यांची निवड करण्यात आली. मारुती तुळसकर, बाबली कुडव, सुभाष सावंत यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. जैतीराश्रित संस्था मुंबईचे अध्यक्ष ऍड प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष विष्णू परब, कार्यवाह नारायण (बन्सी) चव्हाण आणि स्थानिक पदाधिकारी यांनी नूतन अध्यक्ष आणि सर्व कार्यकारणी सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा