You are currently viewing निगुडेतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाना आज मोठया जल्लोष पूर्ण वातावरणात निरोप..

निगुडेतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाना आज मोठया जल्लोष पूर्ण वातावरणात निरोप..

सावंतवाडी/-

निगुडेतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाना आज मोठया जल्लोष पूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अश्या जयघोश्यात निगुडेतील पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाच्या जायघोष्याने चव्हाटा तसेच गणेश कोंड परिसर दुमदुमून निघाला होता… विसर्जन करण्यात येणाऱ्या गणपती मूर्ती चव्हाट्यावर एका पाठुन एक आणण्यात आल्यानंतर गणपती बाप्पाना गाऱ्हाणे करून सामूहिक आरती करण्यात आली.त्यानंतर मूर्ती गणेश कोंड या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी नेण्यात आल्या. यावेळी मोठया प्रमाणात फाटाक्याची आतशबाजी करण्यात आली.आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालरुद्ध तसेच लहानथोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा